Saturday, September 24, 2011

Asa Hava Sunday Hakkacha !!!


Dedicated to my Dear Sunday,


असा हवा सन्डे हक्काचा ,


सकाळी उशिरा उठावे ,
उठून तासभर अन्थरुनात तसेच लोळत रहावे,
नंतर हळूच चाद्रीतुन घड्याळ निरखावे,
आणि आज सुट्टी आहे अशी खात्री होउन परत निजावे,
मग वाटावे  पूरी झाली निद्रादेवी ची आराधना,
उठुनी करुया श्री टीवी ची उपासना,
बातम्या सोडुनी गाणा बघुया दे धक्का चा,
असा हवा सन्डे हक्काचा


आईचे गार्हाणे ऐकू यावे,
पाणी जाईल लवकर अंघोळ करूँ घ्यावे,
अन्थरुनाचा निरोप घेउन आम्ही स्नानग्रुहाचा रस्ता शोधावे,
रस्त्यात येणारया आरश्यात विस्कटलेले दर्पण पहावे,
प्रातिर्विधि उरखुन स्वयंपाकघरात डोकावून बघावे,
शाश्वाती करूँ घ्यावे की आज होइल पोत्भारून नाश्ता इड्ल्यांचा,
असा हवा सन्डे हक्काचा


पोटभरल्यानंतर संगणकाकडे वळवावे,
खेळ खेळत दोन तास घालवावे,
विचार पडतो खरा,
लगेच वाजले कसे बारा,
मुलगा घरात म्हणून आईने जेवण केले ख़ास,
कंठापर्यंत जेवून आम्ही चाललो परत झोपायला बस्स,
जाग येते तेव्हा दिवस ही उतरनिला येतो,
झोपून कंठाला आला म्हणून परत श्री टीवी च आश्रय घेतो,
संध्याकाळ जहाली म्हणून बेत होतो चहाचा,
असा हवा सन्डे हक्काचा


मित्रांसोबत पूर्ण संध्याकाळ घालवावे,
नाही येणार परत असे दिवस म्हणून भरपूर जगावे,
हसत खेळत ध्यानी यावे,
आता दिवस संपला परत झोपी जावे,
उद्या तीच घोडदौड, तीच धावपळ,
चालू जहाला प्रवास पुड्च्या सन्डेचा,
झोपी जाण्या आधी मनी येतो विचार,
देवाला करतो अर्ज असू दे सन्डे 30 तासांचा,
असा हवा सन्डे हक्काचा

----------------Anurag-------------------