Tuesday, April 1, 2014

भास होते तुझे सारखे

भास होते तुझे सारखे,
आहेस तू इथेच कुठेतरी,
आर्श्यात मी जेव्हा पाहतो स्वताला,
डोळ्यात असतेस तू कुठेतरी

मुक्त स्वच्छंद तुझे हसने,
क्षणभर राहणारे तुझे रुसने,
शोधु तुला कुठे सखे साजने,
हृदयातच राहतेस तू कुठेतरी

रिमझीम पडनारय्I  थेम्बांच्या वादळात,
वाट पाहत बसलो मी ओसरिवरि,
कावरे मन हे माझे,
फ़क्त तुझीच वाट बघे,
नसून ही असलेला सहवास,
पाहिजे त्याला कश्यापरी

येशील तू, राहशील तू, हसशील तू, बोलशील तू,
हृदयाचे स्पंदन छेडशील तू,
कधीही न विसरणारा आभास देशील तू,
डोले मिटुनी पाहतो मी जेव्हा तुला,
दिसतेस तू दूर कुठेतरी 


-----------  अनुराग  --------------------