Saturday, February 23, 2013

My Words for You....

शब्द जर माझे पंख लावुनी येतील तुझ्या देशी,
गोंजारून त्या पाखरांना बसवशील ना आपल्यापाशी,
प्रवासाने थकले असतील तर देशील का त्यांना उशी,
समझ असे की शब्द नसुनी मीच आलोय तुझ्यापाशी !!!

कामातून वेळ मिळाला तर कर जरा चौकशी,
दूर देशी राहणाऱ्या साजनाची तब्येत आहे तरी कशी,
उचकी लागताच मला होइल खात्री,
मी नाहीं, तरी माझे शब्द पोचले तुझ्यापाशी !!!!

संध्याकाळ झाली की दे  त्या पाखरांना निरोप,
परतीचा जरी प्रवास मोठा तरी असेल त्यांना हुरूप,
भेटुनी माझ्या प्राणप्रिये ला आनंद झाला हृदयाशी,
आज संपले जरी आयुष्य तरी तक्रार नाही देवापाशी !!!


                                                        XXXXXXXXXXXXXXXX अनुराग XXXXXXXXXXXXXXXXXXXXX